politics google
महाराष्ट्र बातम्या

जामिनसाठी राणा दाम्पत्याचा खटाटोप, आज कोर्टात याचिका दाखल करणार

आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या 'मातोश्री'वर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं. याप्रकरणानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानं अटक झाल्यानंतर आता न्यायालयीन कोठडीत असलेलं राणा दाम्पत्याचे राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी प्रयत्न सुरु आहेत. राणा पती-पत्नी राजद्रोहाच्या प्रकरणात जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे. तर पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्यानं हायकोर्टात केली होती.

दरम्यान, उच्च न्यायालयानं नवनीत राणा आणि रवी राणा यांची ही याचिका फेटाळली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी राणा दाम्पत्यानं पोलिसांना विरोध करणं गैर असल्याची टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. अशातच आज होणाऱ्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालय राणा दाम्पत्याला दिलासा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याप्रकरणात आज अगोदर दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहे. त्यानंतर तातडीनं सकाळच्या सत्रातच जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत. राजद्रोहाच्या आरोपात जामीन देण्याचे अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाहीत. त्यामुळे तिथला वेळ वाचवण्यासाठी दंडाधिकारी कोर्टातील याचिका मागे घेत थेट सत्र न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राणा दांपत्यानं घेतला आहे.

यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर खार पोलिस स्टेशनला त्यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे किरीट सोमय्या गेले होते. यावेळी त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यानंतर सोमय्यांनी थेट दिल्ली गाठत गृहसचिव अजय भल्ला आणि गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली. या हल्ल्याचा निषेध करत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला. विरोधी पक्षाला जीवानीशी संपवायचं, अशी प्रवृत्ती सरकारची असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT