ravi rana criticized shivsena over hanuman chalisa pathan on matoshree mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"हे बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक नाहीयेत, असते तर.."; राणांचे टिकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

हनुमान चालिसा पठण प्रकरणी राज्यात शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर आले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार राणा पती-पत्नी यांनी व्यक्त केला आहे. तर यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असून मोठ्या संखेने शिवसैनिक राणा यांच्या खार येथील घराच्या खाली जमले आहेत.

दरम्यान मुंबई पोलिसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना रोखलं यानंतर राणा यांनी, संपुर्ण महाराष्ट्राला सुख शांती, उन्नतीसाठी हनुमान चालिसा वाचणासाठी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री अधिकारांचा गैरवापर करत आहेत, हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक नाहीयेत, असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिला असता, असे रवी राणा म्हणाले आहेत.

गुंडागर्दी हल्ला करण्याचा प्रतत्न करत आहे, मुख्यमंत्री सांगत आहेत रवी राणा यांच्या घरावर हल्ला करा, तर महाराष्ट्र अस्तव्यस्त होत आहे, यातून महाराष्ट्राची परंपरा खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न होतोय. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न खुद्दा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करत आहेत असा आरोप त्यांनी केला. शिवसैनिक घरात घुसून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच राणा यांनी हनुमानाच्या चरणी यांना सबुध्दी देवो अशी प्रार्थना करतो असेही रवी राणा यावेळी म्हणाले.

खारमधील घरात राणांनी हनुमानाच्या पाया पडून मातोश्रीवर जाणार असल्याचा एल्गार केला आहे. आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण मुख्यमंत्र्यांवर असणार आहे, असं रवी राणांनी स्पष्ट केलं आहे. कार्यकर्ते बोलावून आमच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी आम्ही हे करत आहेत, हनुमान चालिसा पठण करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असं रवी राणांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT