ravindra chavan nandu joshi bagade non-cooperation in BJP Shiv Sena dominance thane district politics
ravindra chavan nandu joshi bagade non-cooperation in BJP Shiv Sena dominance thane district politics sakal
महाराष्ट्र

Shiv Sena - BJP : शिवसेनेच्या वर्चस्वामुळे भाजप मध्ये 'असहकार्या' चे सूर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा या मित्रपक्षात ठाणे जिल्ह्यात मात्र सुत जुळेनासे झाले आहे. विकासकामांसाठी लागणारा निधी, त्या कामांचे श्रेय शिवसेना हायजॅक करत असल्याने भाजपामध्ये आधीपासूनच धुसफुस सुरु झाली होती.

त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हे दोन्ही पक्षातील वितुष्ठ उघड होण्यास कारणीभूत ठरले. मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना ठाण्याचे पाठबळ असल्याने त्यांची बदली न होता सक्तीच्या रजेवर त्यांना पाठविण्यात आल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

तसेच दिव्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासही भाजपाला विशेष स्थान न देता शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनेच्या या वर्चस्वामुळे भाजपा मध्ये असहकार्याचे सूर उमटू लागले आहेत. मित्र पक्षास सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी बैठकीत घेतली. यावेळी शिवसेनेचा निषेध करण्यात आला.

ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि शिंदे व फडणवीस सरकार आले. यामुळे काही काळ भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार अशी चर्चा असतानाच ठाण्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि भाजपला आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची जाणीव झाली. राज्यात वरिष्ठ पातळीवर मैत्रीपूर्ण वातावरण असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सातत्याने खटके उडत होते.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील याविषयीची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे बोलून दाखविली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना देखील याची झळ पोहोचू लागली. चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि हे दोन्ही पक्षातील वितुष्ठाचे ताजे कारण ठरले.

जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असे सांगत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली. मात्र ठाण्याचे पाठबळ बागडे यांना असल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या आधी ही बागडे हे एका ठराविक पक्षातील पदाधिकाऱ्यांना सर्पोट करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

बागडे यांची बदली न झाल्याने भाजपामध्ये असंतोष खदखदत असतानाच दिवा येथे आयोजित विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपाला स्थान देण्यात आले नव्हते. शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरवर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,

आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना त्यात स्थान देण्यात आले नव्हते. याची चर्चा रंगल्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून जागोजागी बॅनर लावत चुकू दुरुस्त करण्यात आली. मात्र भाजपने यावरुन शिवसैनिकांना समाज माध्यमावर धारेवर धरल्याचे पहायला मिळाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत डोंबिवलीकर चव्हाण यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवसेनेतून फारकत घेत गुवाहाटी दौरा करत राज्यात वेगळे सरकार स्थापन करणे या सर्व प्रवासात शिंदे यांच्यासोबत डोंबिवलीकर चव्हाण यांचा मोठा हातभार आहे. तसेच डोंबिवली विधानसभा निवडणूकीसाठी शिंदे यांनी चव्हाण यांना मदत केली आहे.

तर लोकसभा निवडणूकीत खासदार शिंदे यांना निवडून देण्यासाठी भाजपाने मदत केली आहे. मग आत्ताच असे काय झाले की डोंबिवलीकर चव्हाण यांचे ठाणेकरांसोबतचे सूत जुळेनासे झालेत. याला कारण शिंदे यांचे चिरंजीव असल्याचे भाजपा कार्यकर्ते सांगतात. चिरंजीव शिंदे यांचे वर्तन योग्य नसल्याने सारेच दुखावले असल्याची जोरदार चर्चा कल्याण लोकसभेत असून आता ही अरेरावी खपवून घेतली जाणार नसल्याचे सूतोवाच वरिष्ठ नेत्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बैठकीत दिली आहे.

त्यातच कल्याण लोकसभा मतदार संघ हा भाजपाकडे पुन्हा यावा अशी प्रबळ इच्छा भाजपाची आहे. त्यादृष्टीने भाजपाने मोर्चे बांधणी करण्यास देखील सुरुवात केली आहे. सध्याचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा हा शिवसेनेकडेच राहणार असा दावा केला आहे. केंद्र व राज्याचे नेतृत्वाने हे स्पष्ट केल्याचे देखील शिंदे बोलत असल्याने त्यांच्या या वर्तणुकीमुळे देखील भाजपमध्ये नाराजी आहे.

आम्हाला गृहीत धरु नका. विधान परिषद निवडणूक तसेच राष्ट्रपती निवडणूकीत मनसेचा पाठिंबा भाजपला मिळाला होता. त्याची आठवण एका वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना या बैठकीत करुन दिली असून लोकसभा निवडणूकीतही मनसेचा पाठिंबा आम्हाला मिळू शकतो त्यामुळे ''गृहीत धरु नका'' असे त्यांनी शिवसेनेला सुचित केले. यासर्व घडामोडी पाहता भाजपमध्ये खासदार डॉ. शिंदे यांच्या विरोधात जाहीरपणे संघर्षाची भाषा सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT