Ravindra Kulkarni and Suresh Gosavi 
महाराष्ट्र बातम्या

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. गोसावी, तर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. कुलकर्णी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. तर डॉ संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु आहे.

डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी व डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT