Ravindra Waikar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ravindra Waikar : रवींद्र वायकरांचा शिवसेनेत प्रवेश; स्वतःच सांगितलं पक्षप्रवेशाचं कारण

CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ९ वाजता त्यांचा पक्षप्रवेश झाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

संतोष कानडे

CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री ९ वाजता त्यांचा पक्षप्रवेश झाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वायकर यांची मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, मी मागच्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे. तीनवेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे. आरेमधील ४५ किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचं आहे. त्यासाठी १७३ कोटी रुपये पाहिजे आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नाहीये. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले नाहीत तर लोक नाराज होतील. सत्तेमध्ये असल्यानंतरच हे कामं मार्गी लागतील.

वायकर पुढे म्हणाले, देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत. माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांसमोर जावू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी जो विचार दिला तो पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितलेले आहेत. ते सोडवण्याचा सरकार म्हणून मी प्रयत्न करणार आहे.

शिंदे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरात भारताचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. वायकर यांनी त्यामुळे शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. वायकर यांचे काम केवळ मतदारसंघापुरतं नाहीये. संपूर्ण मुंबईसाठी वायकरांचं मोठं काम आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT