Ravindra Waikar Mumbai Police Jogeshwari Land Scam Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ravindra Waikar: "गैरसमजातून गुन्हे दाखल केले," सर्व गुन्हे मागे घेत रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Mumbai Police: दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर जोगेश्वरीचे तत्कालीन आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

आशुतोष मसगौंडे

दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटल्यानंतर जोगेश्वरीचे तत्कालीन आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच्या काळात वायकर यांच्यावर भूखंड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मुंबई महापालिकेने हा गुन्हा गैरसमजातून दाखल केल्याचे म्हणत मुंबई पोलिसांनी नुकतेच खासदार म्हणून निवडून आलेल्या रवींद्र वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित केलेल्या जागेवर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 500 कोटींच्या फसवणकीशी संबंधी असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणात रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी आणि प्रथमपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांचा सहभाग आहे. मात्र, वायकर पहिल्यापासून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हा राजकीय कटाचा भाग असल्याचे वायकर ते म्हणाले होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिंदे यांनी वायकरांनी मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत वायकर यांनी अमोल किर्तीकर यांच्यावर अवघ्या 48 मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान वायकर यांचा हा विजय न्यायालयीन फेऱ्यांमध्ये अडकला असून, मतमोजणीमध्ये गैर प्रकार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT