RBI Bank esakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bank : आरबीआयची एसटी बँकेवर मोठी कारवाई; कर्जवाटप केले बंद

स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑडिट सुरू होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ऑडिट सुरू होते. ज्यामध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भात आणि प्रशासकीय कामकाजाबाबत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहे. ज्यावर आरबीआयने आक्षेप नोंदवला असून, एसटी बँकेच्या प्रशासनाला खडसावले आहे.

बँकेचे खेळते भांडवल अधिक वापरल्याने त्याचा रेशो ७५ ऐवजी ९४ वर गेला आहे. ठेवीदारांनी आतापर्यंत सुमारे ४०० कोटी ठेवी काढून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आर बी आय ने एसटी बँकेचे कर्ज प्रकरण थांबवली असल्याचे पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहे.

एसटी बँकेचे उपमहाव्यवस्थापक किशोर आहेर यांनी एसटी बँकेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. ज्यामध्ये मुख्य कचेरी मार्फत संघनक यंत्रणेतून सर्व प्रकारचे कर्ज खाते तात्पुरत्या कालावधीसाठी डेबिट फ्रिज करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारच्या कर्ज व्यवहारासंबंधी कार्यवाही करू नये अशा सूचना दिल्या आहे.

यासंदर्भात एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांना फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर उपमहाव्यवस्थापक किशोर आहेर यांनी यासंदर्भात माहिती देण्यास टाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : पिंपळनेरकडे येणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक; ७१.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT