reaction from shiv sena after being denied permission for Dasara Melava at shivaji park  esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava ची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे ओपन चॅलेंज

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली

सकाळ डिजिटल टीम

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. महापालिकेच्या या निर्णयानंतर शिवसेनेने ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार असे आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. (reaction from shiv sena after being denied permission for Dasara Melava at shivaji park )

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या निर्णयानंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा हा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार, असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले.

तसेच, शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मुंबई पालिकेनं काय म्हटलंय पत्रात?

दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT