Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्यानंतर शरद पवार गटाची प्रतिक्रिया; म्हटलं आता...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यात अजित पवार गटाचा मंत्रीमंडळाचा शपथविधी काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. त्यानंतर आज अखेर मंत्र्यांना खातेवाटप झालं आहे. यामध्ये अजित पवार यांना अत्यंत महत्त्वाचं असलेलं अर्थ खातं मिळालं आहे. त्यामुळे विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यावर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील प्रतिक्रिया आली आहे.

शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हवं असलेलं वित्त व नियोजन खातं मिळालं. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआत बंड करताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार आमच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप केला होता. तसेच आमची काम होत नसल्यामुळे आम्हाला सरकारमध्ये राहायच नाही, असही सांगितलं होतं.

दरम्यान आता अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना अजितदादांकडे जावं लागेल. त्यामुळे शिंदे गटाने याआधी केलेले आरोप निराधार झाले आहे. तसेच हे आरोप वैयक्तीक कारणासाठी होते, हेही स्पष्ट झाल्याचं महेश तपासे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT