Unlock  esakal
महाराष्ट्र बातम्या

वाचा सुधारित नियमावलीनुसार काय सुरु काय बंद; महत्त्वाचे १० नियम

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

1) १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, मॉल्सही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

2) कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार

3) धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार

4) लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक

5) नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड व कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते

6) उपाहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता

7) खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळ्यांना २०० व्यक्तींनाच परवानगी आणि हॉलमध्ये असेल तर जी आसन क्षमता असेल त्याच्या ५० टक्के परवानगी किंवा १०० या पेक्षा जास्त नाही.

8) २४ तास खासगी कार्यालये सुरू राहू शकतील. एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खासगी कार्यलायांनी त्यांच्या गरजे प्रमाणे एका सत्रात २५ टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवली तर, आपल्याला खासगी कार्यालये सुरू ठेवता येतील, अशी सूचना देण्यात आलेली आहे.

9) सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

10) सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT