Reading Inspiration Day sakal
महाराष्ट्र बातम्या

Reading Inspiration Day : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत राज्यभरात वाचन संस्कृतीचा जागर

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या माध्यमातून राज्यात विविध विषयांवर चर्चासत्रे, वाचनकट्टा, व्याख्यान, वाचक मेळावे, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना 2 हजार पत्रांचे लेखन’ आदी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी दिली.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि मंडळाच्यावतीने हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर ‘चर्चा व अभिवाचन’ हा कार्यक्रम रविवारी, 15 ऑक्टोबर, रोजी सकाळी 11 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

यात चर्चक म्हणून डॉ.रमेश वरखेडे व डॉ. नीतीन रिंढे तसेच अभिवाचक म्हणून डॉ. मंगला वरखेडे व श्रीनिवास नार्वेकर यांचा सहभाग असणार आहे. मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर सदर कार्यक्रम आहेत.

साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात 13 ऑक्टोबर रोजी महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचनकट्टा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना 2 हजार पत्रांचे लेखन’ असे कार्यक्रम होतील. तर 14 ऑक्टोबर रोजी पू. सानेगुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटूर, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व काव्यवाचन : लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम होईल.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ?’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोगत हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालय, पुणे येथे तर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘अभिवाचन व काव्यवाचन हा कार्यक्रम होईल.

मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व अभिवाचन’ हा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘नाट्यअभिवाचन : संगीत देवबाभळी’ हा कार्यक्रम नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड कॉमर्स, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे होईल.

15 ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात व्याख्यान : वाचन संस्कृतीचे वर्तमान आणि युवक’ हा ऑनलाईन कार्यक्रम तर मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पुस्तकावर निबंधवाचन व चर्चा’ हा कार्यक्रम ना. गो. नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कथाकथन’ हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे होणार आहे तर जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचनाचे महत्त्व’ हा कार्यक्रम ज्युनिअर कॉलजे, जयसिंगपूर, येथे होईल तर मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मराठी गद्यलेखनाचे अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यासोबत मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘व्याख्यान : समकालीन वाचनसंस्कृती’ हा कार्यक्रम होईल. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : कशासाठी वाचायचे ?’ हा कार्यक्रम पेठवडगाव, ता. हातकणंगले येथे होणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री; साकारणार भरतची भूमिका

Latest Marathi News Live Update : नशामुख्य अभियानं अंतर्गत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT