Rebel MLA Deepak Kesarkar commented on expenses of rebel shivsena mla  
महाराष्ट्र बातम्या

आमदारांसाठी खर्च कोण करतंय; केसरकर म्हणाले, पगार...

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिंदे गटाचे सर्व बंडखोर आमदार हे काही दिवस गुजरात मधील सुरत येथे तर त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. यादरम्यान सुरतेहून गुवाहाटीचा हा प्रवास बंडखोर आमदारांनी चॅर्टेड विमानाने केला होता, त्यामुळे हे आमदार राहत आहेत त्या फाइव्ह स्टार हॉटेल तसेच विमान प्रवासाचा खर्च कोण करतंय? असा प्रश्न समोर येत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. (Rebel MLA Deepak Kesarkar commented on expenses of rebel shivsena mla)

तुम्ही सुरतमध्ये आणि त्यानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहता आहात तसेच खाजगी विमानाने प्रवास करत आहात याचा नेमका खर्च कोण करतंय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, असेच प्रश्न वेगवेगळ्या राज्यात विचारला जातो, दुसऱ्या पक्षाचे आमदार जेव्हा हॉटेलात जातात तेव्हा साध्या हॉटेलात राहातात का? आमच्या आमदारांचा पगार चांगला आहे, आम्ही काहीच फुकट घेत नाहीत, पैसे देत आहोत आणि ऑफिशीअली देत आहोत. त्यांच्याकडून काय असेल ती सवलत घेतो. पण पैसे भरूनच आम्ही येथे राहतोय, फुकटात तर राहत नाहीत. कोणताही पक्ष आमचा खर्च करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं

केसरकर पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आम्हला बोलावले, त्यांनी सांगितलं त्या विमानात आम्ही बसलो आणि येथे आलो. जे काही पेमेंट असेल ते करू, त्याचा काही प्रश्न नाही. तुम्ही परत का असे प्रश्न विचारत आहात. तुम्हाला का वाटतंय की यामागे भाजप आहे, यामागे भाजप नाहीये. आम्ही सगळ्या नेत्यांना सांगत होतो की भाजपसोबत चला पण त्यांनी ऐकलं नाही. असे केसरकर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT