Abu Azmi Threat Call Esakal
महाराष्ट्र बातम्या

Abu Azmi Threat Call: '3 दिवसांचा वेळ आहे! अबू आझमी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर आली जीवे मारण्याची धमकी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना फोनवरून आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना एका फोनवरून आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली देण्यात आली आहे. याप्रकरणी अबू आझमी यांनी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासंबधी माहिती देताना अबू आझमी म्हणाले की, "या गृहस्थाने मला माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर कॉल करून आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 3 दिवसात जीवे मारण्याची धमकी दिली आहे.(Latest Marathi News)

या प्रकरणाची तक्रार कुलाबा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अबू आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.(Latest Marathi News)

याआधी जानेवारी महिन्यामध्येही अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू असीम आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यांच्या पर्सनल असिस्टंटचा फोन आला होता.(Latest Marathi News)

अज्ञात व्यक्तीने कॉलवर शिवीगाळ केली आणि अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणीही त्यांनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT