Minister Girish Mahajan teacher recruitment assurance 
महाराष्ट्र बातम्या

Recruitment: आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्यात आरोग्य विभागात लवकरच १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. येत्या १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं. (vacancies in the health sector news in Marathi)

याबाबत महाजन म्हणाले की, मार्च २०१८ मध्ये आरोग्य विभागात १३ हजार जागांची भरती निघाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं. आता आम्ही १० हजार १२७ जागा भरणार आहोत. त्यासाठीचं वेळापत्रक निश्चित केले आहे.

फेब्रुवारी-मार्च दरम्यान आम्ही या परीक्षा घेणार आहोत. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्तीपत्रक देणार असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं. ते पुढं म्हणाले की, १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील. तर २५ जानेवारी ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदावारांची यादी जाहीर करणार आहोत. त्यानंतर २५ ते २६ मार्च दरम्यान परीक्षा होतील.

दरम्यान २७ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत निकाल जाहीर करून उमेदवारांची नियुक्ती आम्ही करणार आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT