महाराष्ट्र बातम्या

पोलीस विभागात २० हजार पदांची भरती; फडणवीसांची मोठी घोषणा

तुरुंग विभागात बदल करण्याचाही व्यक्त केला मानस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. (Recruitment of 20 thousand posts in maharashtra police department announcement by HM Fadnavis)

फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आम्ही पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून दोन वर्षांची भरती प्रक्रिया लवकरच हातात घेत आहोत. पोलिसांची सुमारे २० हजार पदं भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ८ हजार पोलिसांच्या भरतीची एक जाहीरात यापूर्वी निघाली आहे, पुढे आणखी १२ हजार पोलिसांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध होईल. यामुळं पोलीस दलाला मोठा फायदा होईल"

जेल विभागात सुधारणा करणं गरजेचं

रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीनं काय उपायोजना करता येतील तसेच जेल विभागात सुधारणा करणं गरजेचं आहे. सध्या आपल्या जेलमध्ये १,६४१ कैदी असे आहेत ज्यांना जामीन मिळालेला आहे पण जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि व्यक्ती नसल्यानं ते तुरुंगातच आहेत. अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत करता येईल? त्यांना बाहेर कसं काढता येईल? त्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचा विचार सुरु आहे, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

तसेच सायबर सिक्युरिटीबाबत मी आढावा घेतला असून याबाबतचं सायबर सिक्युरिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा मानसं आहे. फिशिंगमुळं लोकांना विविध फसवणुकींना सामोर जावं लागतं, त्यामुळं सायबर सिक्युरिटीसाठी मोठं कॅम्पेनही आम्ही हाती घेणार आहोत, असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT