शिक्षक भरती

 
Google
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची भरती! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३,३५१, तर खासगी शाळांमधील १२,१४८ पदे; १९ हजार ८८१ शिक्षकांना मिळणार थेट नियुक्ती

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका) व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांची भरती होणार आहे. ही भरती त्या त्या व्यवस्थापनाकडील रिक्त पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण या बाबींचा विचार करून ८० टक्के पदे भरली जाणार आहेत. पवित्र पोर्टलवर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका) व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांची भरती होणार आहे. ही भरती त्या त्या व्यवस्थापनाकडील रिक्त पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण या बाबींचा विचार करून ८० टक्के पदे भरली जाणार आहेत. पवित्र पोर्टलवर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत ही चाचणी पार पडली. या चाचणीसाठी दोन लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ११ हजार ३०८ उमेदवार चाचणीस बसले. त्यापैकी एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केले आहे. आता उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे. उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. त्याठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट करून पदनिहाय पसंतीक्रम नमूद करायचा आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ६ ते ११ ऑगस्टपर्यंत तो लॉक करायचा आहे. त्यानंतर ‘मुलाखतीशिवाय’ प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

भरतीतील रिक्त पदांची स्थिती

  • जिल्हा परिषद : १३,३५१

  • नगरपालिका : २८०

  • महापालिका : १,९५४

  • आदिवासी विकास विभागाच्या शाळांवरील पदे : २,४२१

  • शासकीय विद्यानिकेतन : ५६

  • खासगी शिक्षण संस्था : १२,१४८

  • एकूण : ३०,२०९

इयत्तानिहाय शिक्षक पदभरती

  • इयत्ता पहिली ते पाचवी : १४,३२०

  • इयत्ता सहावी ते आठवी : १०,०१२

  • इयत्ता नववी ते दहावी : ५,५१३

  • इयत्ता अकरावी व बारावी : ३६४

  • एकूण : ३०,२०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT