Mantralay News sakal media
महाराष्ट्र बातम्या

अंगणवाडी सेविकांची ३१ मार्चपूर्वी भरती! १०० गुणांद्वारे होणार ‘अशी’ अंतिम निवड

राज्यात अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे.

अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.

दरम्यान, उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व शहरातील उपायुक्त करतील. उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातरजमा केली जाईल. त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्पातील एक कर्मचारी, एक पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील. भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे.

निवडी संदर्भातील ठळक बाबी

  • एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड

  • शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी

  • शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड

  • ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी

  • बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार

भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण

इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील. ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत. पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.

पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT