gopichand padalkar and Eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Dhangar Reservtion : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत पडळकरांचं मोठं विधान; म्हणाले, सरकारने...

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आणि ओबीसी आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत आक्रमक असून समाजाकडून उपोषण सुरू आहे. त्यातच आता आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर आरक्षणासंदर्भात बैठक घेण्याचं पत्र दिलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी उपोषण आणि आंदोलनं सुरू आहे. सरकारकडे आमची हीच मागणी आहे की, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सरकारने बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा. आज फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे. बाकी कोणताही विषय आजच्या घडीला महत्त्वाचा नसल्याचं त्यांनी नमूद केलं.

पडळकर पुढं म्हणाले की, आमच्या आरक्षणाचं सोपं प्रकरण आहे. नीट समजून घेतलं पाहिजे. राज्यात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही. २००७ साली मी हे आंदोलन सुरू केलं. त्यावेळी ५२ सभा घेतल्या. त्यावेळी तत्कालीन सरकारने आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती.

आम्ही महितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली होती की राज्यभरात तहसीलने किती लोकांना धनगड जातीचं प्रमाणपत्र दिलं. त्यामध्ये राज्यभरातील अनेक तहसीलदारांनी सांगितलं की, राज्यात धनगड जातीचं कोणालाही प्रमाणपत्र दिलं नसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, असा दावा पडळकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT