Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांना दिलासा! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आयकर विभागाचा मोठा निर्णय

आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई आयकर विभागाने ही जप्ती हटवली आहे.

गुरू कॉमोडीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेवरचे जप्तीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. या मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना, काही जमीन आणि इमारतीतील काही भाग यांचा समावेश होता. त्याचबरोबर साताऱ्यामधल्या चिमणगाव गावातल्या मालमत्तेवरची जप्तीचे आदेश देखील मागे घेण्यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला होता. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर कारखान्याला 96 कोटींचं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 225 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.तर आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरुपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवली आहे.त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदी कोसळले! पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; काय आहे ताजा भाव?

Instagram ने लॉन्च केलं 'Instants' फीचर; आता क्षणात गायब होणार प्रायवेट फोटो, Snapchat ला मोठी टक्कर, कसं वापरायचं पाहा

Maharashtra Latest News Live : इंधन दरवाढीचा फटका; भाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडतोय का? शार्दूल ठाकूरला सामान्यानंतर प्रश्न, काय म्हणाला वाचा

Solapur family Story: ३० वर्षे फुटपाथवर झोपले, पण मायेची वीण नाही उसवली; सोलापुरातील जांभळे कुटुंबाची मायेची गोष्ट, २९ माणसं, एकच चूल!

SCROLL FOR NEXT