relief to uddhav Thackeray shiv sena election commission gives 4 weeks to submit documents  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंना दिलासा! सेनेला पुन्हा निवडणूक आयोगाकडून चार आठवडे मुदत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आमदारांबद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे यासोबतच दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश शिवसेना आणि शिंदे गटाला दिले. यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. या मागणीला पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने ४ आठवड्याची मुदत दिली आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला चार आठवड्याचा वेळ दिला आहे.

सुप्रीम कोर्टात घटनापीठाची तारीख तसेच शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यादरमय्यान २३ ऑगस्टला शिवसेनेला आधी दिलेली पुरावे सादर करण्याची मुदत संपुष्टात येत होती. त्यामुळे शिवसेनेने चार आठवड्याची मुदत मागीतली होती ती त्यांना असी मुदत देण्यात आली आहे. मागच्या वेळी देखील शिवसेने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता तेव्हा शिवसेनेला दोन आठवड्याचा वेळ दिला होता, हा वेळ २२ ऑगस्ट रोजी संपला होता.

सुप्रीम कोर्टामध्ये अनेक मुद्दे प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये अशी उद्धव ठाकरे यांची भुमिका आहे. दरम्यानच्या काळात घटनापीठ स्थापन झाल्यानंतर यासंदर्भात काय होतं हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दिलासा देत कागदपत्रे सादर करण्यासाठी मागीतलेली चार आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवसेनेवरील दावा सिध्द करण्यासाठी चार आठवड्यात उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT