happy-new-year-2025 sakal
महाराष्ट्र बातम्या

नववर्ष साजरे करताना ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होईल कारवाई! ३१ डिसेंबरला पहाटेपर्यंत वाईन शॉप, बिअरशॉपी खुली राहणार; हॉटेल, ढाब्यांवरील पार्ट्यांवर विशेष लक्ष; चौकाचौकांत नाकाबंदी

हॉटेल- ढाब्यांवर, क्लबमध्ये विनापरवाना नववर्षाच्या स्वागताची पार्टी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व शहर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने 7 पथके नेमली असून, शहर पोलिसांनी देखील विविध ठिकाणी फिक्स पॉइंट्‌स लावले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : हॉटेल- ढाब्यांवर किंवा क्लबमध्ये विनापरवाना नववर्षाच्या स्वागताची पार्टी करणाऱ्यांवर व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व शहर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सात पथके नेमली असून, शहर पोलिसांनी देखील शहरात विविध ठिकाणी फिक्स पॉइंट्‌स लावले आहेत. ३१ डिसेंबर रोजी चौकाचौकांत रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी देखील असणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार, ३१ डिसेंबर रोजी वाईन शॉप व बिअर शॉपी पहाटे एक वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. दुसरीकडे, परमीट रूम व क्लब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. दरम्यान, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’अंतर्गत त्या वाहनचालकास दहा हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय त्याचा वाहन चालविण्याचा परवाना देखील निलंबित करण्याची कारवाई होईल. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना स्वत:वर कोणतातरी गुन्हा दाखल होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले आहे.

...तर ढाबा मालकाला ५० हजारांपर्यंत अन्‌ मद्यपींना पाच हजारांचा होईल दंड

परमीट रूममध्येच मद्यपानास परवानगी असून बाहेर कोणत्याही हॉटेल किंवा ढाब्यांवर मद्यपानास बंदी आहे. मद्यपान करणाऱ्यांकडे अधिकृत परवाना बंधनकारक आहे. हॉटेल, ढाब्यावर बसून मद्यपान करताना कोणी आढळल्यास त्याला तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत आणि हॉटेल, ढाब्यावर बेकायदेशीर दारू पिण्याची सोय केल्याबद्दल ढाबा मालकास २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मागील तीन महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ ढाब्यांवर कारवाई केली असून, तेथील मद्यपी व ढाबा- हॉटेल मालकांना न्यायालयाने सव्वातीन लाखांचा दंड केला आहे.

क्लबमधील एक दिवसाच्या पार्टीसाठी मोजावे लागतील २४ हजार रुपये

नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी क्लबमध्ये करण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. एका दिवसासाठी २४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. परवानगीशिवाय पार्टी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा देखील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

परवाना घेऊनच पार्टी करावी, अन्यथा कारवाई

नववर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांसह बेकायदा हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानाची सोय किंवा मद्यपान करणाऱ्यांवरही आमच्या पथकांचे लक्ष राहील. जिल्हाभरात ३१ डिसेंबर रोजी सात पथके सर्व बाबींवर लक्ष ठेवून असतील.

- भाग्यश्री जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

शहरात १३ ठिकाणी नाकाबंदी, तर ७२ ठिकाणी फिक्स पॉइंट

३१ डिसेंबर रोजी सोलापूर शहरात ७२ ठिकाणी फिक्स पॉइंट लावले जाणार असून १३ ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. सहा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आले असून, चार आरसीपी पथके, गुन्हे शाखेची सहा पथके, दामिनी पथक, बीट मार्शल, अशा प्रकारचा बंदोबस्त शहरात लावला जाणार आहे. याशिवाय ६५ अधिकारी व ७३५ अंमलदारांनाही ३१ डिसेंबरच्या रात्री बंदोबस्ताची ड्यूटी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT