Duplicate Voters

 

ESakal

महाराष्ट्र बातम्या

दुबार मतदारांचे झेडपीसाठी तिसऱ्यांदा मतदान! सोलापूर जिल्ह्यात ३८,९०९ पैकी १८,१४५ दुबार मतदार सापडलेच नाहीत; नगरपालिका, महापालिका क्षेत्रातही ५३००० दुबार मतदार

नगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीत सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५१४ दुबार मतदार होते. महापालिकेसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीत २३ हजार ५६३ मतदार दुबार आढळले. जिल्हा परिषदेच्या मतदार यादीत देखील तब्बल ३८ हजार ९०९ दुबार मतदार आहेत. यातील काहींनी नगरपालिकेत मतदान केले असून आता महापालिकेत आणि पुढे जिल्हा परिषदेसाठीही मतदान करतील.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीत सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५१४ दुबार मतदार होते. महापालिकेसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीत २३ हजार ५६३ मतदार दुबार आढळले. जिल्हा परिषदेच्या मतदार यादीत देखील तब्बल ३८ हजार ९०९ दुबार मतदार आहेत. यातील काहींनी नगरपालिकेत मतदान केले असून आता महापालिकेत आणि पुढे जिल्हा परिषदेसाठीही मतदान करतील. त्यांच्याकडून हमीपत्रे घेतली, पण ते प्रभाग, गट, गणासंदर्भातील आहेत.

सोलापूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांसाठी २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आहेत. त्यात ३८ हजार ९०९ दुबार मतदार आहेत. दुबार मतदार कोठे मतदान करणार याचे हमीपत्र घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यातील १८ हजार १४५ मतदार प्रशासकीय यंत्रणेला सापडलेच नाहीत. उर्वरित दुबार मतदारांनी आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कोणत्या गट-गणात मतदान करणार, यासंदर्भातील हमीपत्रे दिली आहेत.

दरम्यान, अनेक मतदारांची नावे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या मतदार यादीत देखील आहेत. तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगवेगळ्या टप्प्यांवर झाल्याने त्यांना मतदार यादीत नाव असल्याने नियमानुसार त्याठिकाणी मतदान करता येणार आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या मतदारांचे नाव दोन गटात किंवा पंचायत समितीच्या दोन गणात आहे, त्यांना दोन्ही ठिकाणी मतदान करता येऊ नये म्हणून त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुबार मतदारांची स्थिती

  • एकूण दुबार मतदार

  • ३८,९०९

  • हमीपत्र दिलेले

  • २०,७६४

  • हमीपत्र न दिलेले

  • १८,१४५

इलेक्शन ड्युटीसाठी ९००० शिक्षक

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक तहसीलदारांनी मतदानासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली आहे. तीन-चार दिवसांत प्रत्येकाला त्यासंदर्भातील पत्रे पाठविली जाणार असून १० दिवसांनी त्यांचे प्रशिक्षण होईल. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ७५८ मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी साधारणतः नऊ हजार शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असणार आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पावणेचार हजार शिक्षक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पनवेल महापालिका प्रभाग १९ मधील मतदान केंद्रावर गोंधळ; भाजप–महाविकास आघाडी कार्यकर्त्यांत वाद

Gold Silver News : सोने, चांदीचे दर उतरणार नाहीत, गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज; दिवसभरात सोने २ तर चांदी १८ हजारांनी महागली

Abhay Yojana : अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; पुणे पालिका तिजोरीत दोन महिन्यांत ६४५ कोटी जमा

Solapur politics: दुबार मतदार तिसऱ्यांदा करणार जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान; साेलापूर जिल्ह्यात एकूण ३८,९०९ दुबार, १८ हजार मतदार सापडलेच नाहीत!

Iran Airspace Closure : इराणचे हवाई क्षेत्र बंद, अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता; एअर इंडिया, इंडिगोने जारी केली अडव्हायझरी

SCROLL FOR NEXT