Prostitution is not crime  sakal
महाराष्ट्र बातम्या

वेश्या व्यवसायातील 11 महिला-मुलींची सुटका! ग्रामीण पोलिसांचे ‘या’ ठिकाणे छापे; पीडितांमध्ये ठाणे, मुंबईसह पश्चिम बंगाल, कलकत्ता येथील मुली

परराज्यातून कोणाच्यातरी ओळखीतून सोलापूर जिल्ह्यात येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या ११ पीडितांची सुटका ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पीडितांमध्ये ठाणे, मुंबईसह पश्चिम बंगाल, कलकत्ता अशा राज्यातील मुली-महिलांचा समावेश आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : परराज्यातून कोणाच्यातरी ओळखीतून सोलापूर जिल्ह्यात येऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या ११ पीडितांची सुटका ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पीडितांमध्ये ठाणे, मुंबईसह पश्चिम बंगाल, कलकत्ता अशा राज्यातील २५ वयोगटातील मुली, महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस कारवाईत सापडलेल्या महिला- मुली कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने, पतीने सोडून दिले किंवा कोणीतरी फसवून वेश्या व्यवसायात आणले, अशा पीडिता आहेत. २४ जानेवारीपासून ग्रामीण पोलिसांच्या या कक्षाने बार्शी, मंगळवेढा, कुर्डुवाडी व माळीनगर रोड अशा ठिकाणी छापे मारले. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री करूनच त्याठिकाणी छापे घातले आहेत.

विशेष बाब म्हणजे छाप्यात सापडलेल्या पीडितांना ना लिहायला ना वाचायला येते. पोलिसांनी जबाब घेतल्यानंतर स्वाक्षरी करण्याऐवजी बहुतेक पीडितांनी अंगठाच केल्याचेही अधिकाऱ्यांना पहायला मिळाले. दरम्यान, पीडितांना वेश्या व्यवसाय करायला लावून त्यांच्या कमाईवर स्वत:ची उपजिविका भागविणाऱ्या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या पीडिता नेमक्या त्यांच्यापर्यंत पोचल्या कशा, यामागे काही रॅकेट आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.

पळून गेलेल्या ३३ अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश

३३ अल्पवयीन मुलींचाही शोध, सुरत, राजस्थान अशा ठिकाणी मुली प्रियकरासोबत पळून गेल्या होत्या. पोलिस ठाण्यात बेपत्ता मुलींसंदर्भातील फिर्याद दाखल झाल्यानंतर चार महिने त्याच ठिकाणी तपास होतो. पण, त्या काळात पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांना त्या मुली नाही मिळाल्या तर त्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपविला जातो. या पथकाने मागील तीन वर्षांत ३३ मुलींना विविध ठिकाणाहून शोधून काढले. त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

ग्रामीण पोलिसांच्या ‘या’ पथकाची कामगिरी

पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक मोनाली पवार, मोतिराम मोरे, रेवणसिद्ध काळे, सहायक फौजदार मंजुळा धोत्रे, पोलिस हवालदार सविता कोकणे, सुर्यकांत जाधव, सचिन वाकडे, लक्ष्मण राठोड, पोलिस शिपाई प्रिती पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT