Pankaja Munde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : नाराजी कायम? फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला पंकजांची दांडी

पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर नाहीच!

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत आहे. अशातच त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटकडून पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. अशातच आज बीडच्या पाटोदा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या.

दरम्यान पंकजा मुंडे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी कायम आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष जय प्रकाश नड्डा राज्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हाही निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नव नव्हतं. तरीही त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्यानंतर त्यांना भाषणसाठीचा वेळही 2 मिनिटांचा देण्यात आला. त्यांनी एका मिनिटांत आपलं भाषण संपवल.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

या वेळीचा दौरा रद्द का झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार होते. त्यामुळे पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावरून काय बोलणार? अशी चर्चा रंगली होती. पण पंकजा मुंडे यांनी अचानक हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या गडावर मुंडे भावंडं परंपरेनुसार एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. मात्र धनंजय मुंडेंचा अपघात झाल्याने यंदा धनंजय मुंडे हे गडावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याने ठाकरे गटाने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. या ऑफरवर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे गहिनीनाथ गडावरून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आपली भूमिका मांडतील असं सांगितलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT