reservation of OBC community OBC sub castes should come together Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसींतील उपजातींनी एकत्र यावे : छगन भुजबळ

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ओबीसी समाजाच्या आरक्षणात विघ्नहर्ते कमी असून, विघ्न आणणारेच जास्त आहेत. लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेला हा समाज एकत्र आल्यास राज्यासह देशात वेगळे चित्र निर्माण होईल. मात्र, आपसांतील भांडणांमुळे ही लढाई अवघड बनेल. ती जिंकण्यासाठी ओबीसींमधील विविध उपजातींनी एकत्र येणे व राहणे गरजेचे आहे. असे मत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

मल्हारराव होळकर जन्मोत्सवाचे औचित्य साधत धनगर समाजाचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भुजबळ अध्यक्षस्थानाहून बोलत होते. छोट्या समाजात नेता तयार होणे अवघड असतानाच आपसांतील लढाईमुळे ते कठीण होत असल्याचे सांगत सर्वांनी एकत्र राहण्याचा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला.

साहित्य संमेलन यशस्वीच

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले- पाटील यांनी नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीका केली होती. संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या छगन भुजबळ यांनी या टीकेकडे लक्ष देत नसल्याचे वक्तव्य केले. भुजबळ म्हणाले, ‘‘नाशिकच्या संमेलनावर कितीही टीका झाली तरी हे संमेलन पुढील अनेक वर्ष साहित्यिक विसरणार नाहीत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT