Gunratna Sadavarte Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची याचिका; 8 तारखेला सुनावणी

Maratha Reservation: मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे; 8 तारखेला सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यामध्ये बीड आणि परिसरात मराठा आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद आहेत तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. याच अनुषंगाने आता Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक असताना आणि खुद्द सदावर्ते यांच्या चारचाकी गाड्या फोडलेल्या असतानाही त्यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 25 ऑक्टोबरपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणनंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण कोर्टात रद्द ठरवण्यात आलेलं होतं. आता पुन्हा त्यांनी मराठा आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटी येथे सरकारचं शिष्टमंडळ पोहोचत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT