Maharashtra State Election Commissioner addresses the press, confirms post-Diwali local body elections without VVPAT machines and over multiple phases.  esakal
महाराष्ट्र बातम्या

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

राज्यातील ३२ जिल्हा परिषदांचे गट व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या गणांसाठी १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर तब्बल ४४ व्या दिवशी आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

तात्या लांडगे

प्रमोद बोडके

सोलापूर : राज्यातील ३२ जिल्हा परिषदांचे गट व त्या अंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या गणांसाठी १३ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर तब्बल ४४ व्या दिवशी आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गट व गणासाठी सोमवारी (ता.१३) जिल्हास्तरावर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी असलेली १९९६ ची नियमावली शासनाने रद्द केली आहे. ग्रामविकास विभागाने २० ऑगस्टला नवी नियमावली केली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरताक्रम केला जाणार आहे. नव्या नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीसाठी आरक्षणाची सुरवात शुन्यापासून होणार आहे. अनुसूचित जाती व जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले गट व गण अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव होणार आहे. जिल्ह्यातीलील अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव केल्या जाणाऱ्या गट व गणांचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी सोमवारपर्यंत (ता. ६) विभागीय आयुक्तांना पाठविणार आहेत. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त बुधवारपर्यंत (ता. ८) मान्यता देणार आहेत.

अनुसूचित जाती/जमातीसाठी राखीव झालेल्या गटातून निम्मे गट या प्रवर्गातील महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निवडले जाणार आहेत. अनुसूचित जाती/जमातीचे गट वगळून उर्वरित गटातून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांप्रमाणे गट व गण राखीव केले जाणार आहेत. त्यातून ओबीसी महिलेसाठी चिठ्ठीद्वारे निम्मे गट राखीव केले जाणार आहेत. एससी, एसटी, ओबीसी आरक्षण झाल्यानंतर उर्वरित गटातून निम्म्या गटांसाठी चिठ्ठीद्वारे सर्वसाधारण महिलेचे आरक्षण काढले जाणार आहे. चिठ्ठ्या काढून राहिलेले गट सर्वसाधारण असणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे.

असा आहे सोडतीचा कार्यक्रम

  • आरक्षण सोडत : १३ ऑक्टोंबर

  • आरक्षणावर दावे व हरकती : १४ ते १७ ऑक्टोंबर

  • हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्तांना अभिप्राय : २७ ऑक्टोबरपर्यंत

  • आरक्षण अंतिम करणे : ३१ ऑक्टोंबर

  • अंतिम आरक्षणाची राजपत्रात प्रसिध्दी : ३ नोव्हेंबरपर्यंत

सोलापूर जिल्हा परिषदेच्या गटाची विभागणी

  • एकूण जागा : ६८

  • अनुसूचित जमातीसाठी : ०१

  • अनुसूचित जातीसाठी : १० (निम्म्या जागा महिलांसाठी)

  • नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) : १८ (निम्म्या जागा महिलांसाठी)

  • सर्वसाधारण महिलांसाठी : २०

  • सर्वसाधारण : १९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Minister absence from Cabinet Meeting : शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला का होते गैरहजर?, उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले...

ती परत येतेय! 11 वर्षानंतर रेखा पुन्हा सिनेमामध्ये पहायला मिळणार, व्या 71 वर्षी पुन्हा झळकणार अभिनयाची जादू

Goa New Rules : गोव्याला जाताय? मग अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर नव्या नियमानुसार द्यावा लागेल हजारोंचा दंड

Horoscope Prediction : मेष ते मीन..संपूर्ण राशीभविष्य! उद्याचा दिवस कसा असेल? कुणाला मिळणार गुड न्यूज अन् कुणाला बॅड न्यूज, जाणून घ्या

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला लागली आग; थोडक्यात वाचला अभिनेता

SCROLL FOR NEXT