Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : “उद्धव ठाकरेंबद्दल आदर, तर अजितदादा निर्मळ मनाचे", शिंदे गटाचे नेते हे काय बोलून गेले

केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीला जाऊन साईंबाबांच दर्शन घेतलं. यावेळी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा माणूस आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नव्हतं, असंही केसरकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आग विजवावी लागतं. ती आग कशामुळे लागली ते नंतर बघू . पण अगोदर आपण आपल घर सुरक्षित ठेवू या. असं मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याचं दु:ख वाटलं नाही. पण जे काही माध्यमांत दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. असं काम होता कामा नये , प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळयांची उत्तर देईल, असंही केसरकर म्हणाले आहेत.

तर केसारकरांनी पुढे बोलताना म्हंटलं की, अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. अजितदादा बोलताना फटकळ बोलत असतील मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर त्यांच्यासारखा असावा, असं वाटतं, अशा शब्दात दीपक केसरकरांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT