onion  esakal
महाराष्ट्र बातम्या

Onion : कांदा निर्यातीवर दहा वर्षांत वीस वेळा निर्बंध

‘अपेडा’ची माहिती; केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे चढ-उताराचे राजकारण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत असताना गेल्या दहा वर्षांत तब्बल २० वेळा सरकारने निर्यातीमध्ये हस्तक्षेप केल्याचे ‘अपेडा’च्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

सरकारने किमान निर्यात मूल्य कधी वाढविले तर शेतकऱ्यांचा दबाव वाढविल्यानंतर हे शुल्क घटविण्याचा देखील निर्णय घेतला. कांद्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाला फक्त मोदी सरकारच नव्हे तर तत्कालीन काँग्रेस सरकारही जबाबदार असल्याचे यावरुन दिसून येते.

देशांतर्गत कांद्याची मागणी विचारात घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने १९ ऑगस्ट २०२३ रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. मूळात महाराष्ट्रात लाल कांद्याची लागवड कमी प्रमाणात झालेली आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होते. उत्तर महाराष्ट्रात तर दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे कांदा लागवडीचा प्रश्नच नाही. अशा परिस्थितीत शेतकरी व व्यापारी यांच्याकडे असलेला कांदा बाहेरच्या देशात गेल्यास देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची भीती केंद्र सरकारला वाटते.

त्यामुळे निर्यातीवर शुल्क लागू करून भाव नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन सरकारने केलेले दिसते. पण हे काही फक्त भाजपच्या काळात झाले असे नाही तर, तत्कालीन काँग्रेस सरकारने देखील कांदा निर्यातीवर वेळोवेळी निर्बंध लावले आहेत.

केंद्र सरकार सातत्याने कांदा निर्यातीमध्ये हस्तक्षेप करून भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. निर्यात शुल्क अधिनियम १९६२ च्या आधारे निर्यात शुल्क ठरवले जाते. दोन वर्षांपूर्वी कांदा साठवणुकीवरही निर्बंध लादण्यात आले होते.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

निर्यात प्रतिबंधित करण्याचा निर्णय सरकारला अल्पकाळासाठी फायद्याचा वाटत असला तरी दीर्घकाळासाठी तोट्याचा ठरणार आहे. यामुळे निर्यातीची बाजारपेठही हातातून जाईल. निर्यातीबाबत सातत्याने धरसोडीचे धोरण पाकिस्तान, चीन आदी स्पर्धक कांदा उत्पादक देशांच्या पथ्यावर पडते.

- दीपक चव्हाण, कृषी अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT