Cyber Fraud

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

निवृत्त बॅंक अधिकारी ६० लाखाला फसला! दागिने विकले, नातेवाइकांकडूनही पैसे घेतले, सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडले; आभाशी २ कोटी दिसले,‌ त्याचा टॅक्सही भरला, पण...

सोलापुरातील नवीन आरटीओ ऑफिसजवळ राहणाऱ्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सायबर गुन्हेगारांनी ६० लाख रुपयाचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास खूप जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखविले होते. ५ जुलै ते १७ डिसेंबर या सहा महिन्यांत त्यांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले, घरातील दागिने मोडले, स्वत:चेही पैसे त्यात गुंतवले होते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील नवीन आरटीओ ऑफिसजवळ राहणाऱ्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सायबर गुन्हेगारांनी ६० लाख रुपयाचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास खूप जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखविले होते. ५ जुलै ते १७ डिसेंबर या सहा महिन्यांत त्यांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले, घरातील दागिने मोडले, स्वत:चेही पैसे त्यात गुंतवले होते. सोलापूर शहर सायबर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सायबर गुन्हेगाराने बनावट फेसबूक आयडी तयार करून निवृत्त बॅंक अधिकाऱ्यांना मेसेज पाठविला. त्यावर शेअर मार्केटबद्दल माहिती होती. त्यावर क्लिक केल्यावर फिर्यादीचा नंबर सायबर गुन्हेगारांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट झाला. त्या ग्रुपवर शेअर मार्केटसंदर्भात इतर बनावट सदस्य खूप फायदा झाल्याचे बोलत होते. त्या खोट्या मेसेजला बळी पडलेल्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्याने सुरवातीला ३० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना काही दिवसांतच आठ- दहा हजाराचा फायदा मिळाल्याचे दाखविले.

त्या रकमेचे आभाशी स्टेटमेंट व्हॉट्‌सॲपवर पाठविले. त्यानंतर आपण काही दिवसांत लाखो रुपये कमावणार, असा विश्वास निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास वाटला. त्यातून त्यांनी जादा पैसे गुंतविले. सायबर गुन्हेगारांनी त्यांची रक्कम गुजरात, राजस्थान, केरळ, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधील खात्यात वर्ग केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा करीत आहेत.

दोन कोटींचा साडेनऊ लाख टॅक्स भरला, तरीपण...

काही दिवसांनी तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचासाठी प्रयत्न केला. त्यावेळी पैसे परत मिळाल्याने तक्रारदार समोरच्या व्यक्तीला मेसेजव्दारे संपर्क केला. फसवणूकदारांनी कळविले रक्कम काढण्यापूर्वी त्यावरील इन्कम टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी परत पैसे भरावे लागतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे साडेनऊ लाख रुपये भरले. पैसे भरल्यावर तरी संपूर्ण रक्कम मिळेल, अशी आशा होती. मात्र, तुम्ही टॅक्स भरण्यास उशीर केल्याने दंड भरावा लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी निवृत्त बॅंक अधिकाऱ्यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. शेवटी निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सगळे पैसे संपल्यावर संशय आला आणि त्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT