Cyber Crime sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास 63 लाखांचा गंडा! आधी फेसबूकवर मेसेज, नंतर व्हॉट्‌सॲप ग्रूपमध्ये घेऊन फसवणूक; पहिले पाच हजाराला 5000 दिले, अन्‌...

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास १०० ते १५० टक्के फायदा होईल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हनुमंत बळीराम कोकरे (वय ६७), रा. विजयपूर रोड, सोलापूर) यांना तब्बल ६३ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. त्यांची १८ जुलै ते २३ डिसेंबर २०२५ या काळात फसवणूक झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांतीलाल शहा नामक व्यक्तीसह इतरांविरुद्ध सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास १०० ते १५० टक्के फायदा होईल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हनुमंत बळीराम कोकरे (वय ६७), रा. विजयपूर रोड, सोलापूर) यांना तब्बल ६३ लाख २६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. त्यांची १८ जुलै ते २३ डिसेंबर २०२५ या काळात फसवणूक झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांतीलाल शहा नामक व्यक्तीसह इतरांविरुद्ध सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

राहत्या घरी असताना हनुमंत कोकरे हे फेसबूक पाहत असताना त्यांना शांतीलाल शहा नावाच्या व्यक्तीने मेसेज केला. ‘मी रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे सीईओ आहे’ असे सांगून ‘कंपनीत शेअर गुंतवणूक करा, तुम्हाला सेवा पाहिजे असल्यास कळवा, आम्ही तुम्हाला सेवा देऊ’ असे सांगितले. त्यानंतर शांतीलाल शहा नामक व्यक्तीने कोकरे यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. रिलायन्स इंडस्ट्रीज रिनिवेबल सोलार इनव्हेस्टमेंट स्किममध्ये पैसे गुंतवणुकीसाठी मेसेज पाठवले. त्या ग्रुपमधील इतर सदस्य शेअर मार्केटमध्ये १०० ते १५० टक्के फायदा होत असल्याचे मेसेज टाकत होते. त्यावेळी कोकरे यांनी सुरवातीला पाच हजार रुपये गुंतवले. त्यावेळी त्यांना चांगला परतावा मिळाला.

त्यानंतर विश्वासाने कोकरे यांनी वेळोवेळी पैसे गुंतवले. जवळचे पैसे संपल्याने त्यांनी पैसे विड्राल करण्याची विनंती केली. त्यावेळी समोरील व्यक्तीने कमिशनची रक्कम द्यावी लागेल असे सांगून पैसे पाठवायला सांगितले. कोकरे यांनी पुन्हा पैसे पाठविले, परंतु त्यांना पैसे काढताच आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांत ऑनलाइन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत.

पाच हजाराला पाच हजार दिले, अन्‌...

कोकरे हे निवृत्त बॅंक व्यवस्थापक आहेत. त्यांना निवृत्तीवेळी मिळालेली रक्कम आणि नातेवाईकांकडून पैसे घेऊन सायबर गुन्हेगार सांगतात तसे त्यांना पाठविले. पैसे कमी पडू लागल्यावर त्यांनी घरातील पत्नीचे दागिने देखील मोडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी जुलै ते डिसेंबर या दरम्यान एकूण २१ बॅंकांमधून ३०२ वेळा सायबर गुन्हेगारांना पैसे पाठविल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT