महाराष्ट्र बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे होणार? शिंदे सरकार निर्णय घेण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे होऊ शकतं. तसा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याचं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सांगितलं आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय ६० वर्षे आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चिला गेला. त्यामुळे येत्या काळात राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ डिसेंबर रोजी महासंघाने एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होतं. मात्र त्यासंदर्भात बैठक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची एक बैठक निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. बैठकीत जुनी पेन्शन योजना आणि कर्मचाऱ्यांच्या निवृतीवयासंदर्भात चर्चा होणार आहे. वयाची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे. महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT