imd sakal media
महाराष्ट्र बातम्या

IMD : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने; राज्यातील काही भागातून माघार

राज्यात मंगळवार सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास काहीसा वेगाने सुरू आहे. तर मंगळवारी महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे आता राज्याच्या बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. सध्या परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात राज्याच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघारी फिरेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात मंगळवार सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. तर नाशिक, औरंगाबाद, नांदेडच्या उत्तरेकडील भागातून मॉन्सून बाहेर पडला आहे. तर बुधवारी (ता.१३) कोकणातील काही भागात, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याची तीव्रता वाढून ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्र व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी दक्षिण भारतातील राज्यांसह मध्य महाराष्ट्र तुरळक, कोकणच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात हीपुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. मंगळवारी शहरात ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तर २० अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने काढता पाय घेतला आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस शहरात मुख्यतः हवामान कोरडे असून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT