monsoon sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास शनिवारी (ता. ५) सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर अरबी समुद्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास शनिवारी (ता. ५) सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. ६) कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस; तर कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे तुरळक ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांना मंगळवारपर्यंत (ता. ८) ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT