mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

महसूल विभागाची भन्नाट मोहीम! ‘जिवंत सातबारा मोहीमे’तून ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार; १ ते २१ एप्रिलपर्यंत संधी

सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात १ मार्चपासून सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता १ एप्रिलपासून राज्यात सगळीकडे राबविली जाणार आहे. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोहिमेसंदर्भातील ठळक बाबी...

  • १ ते ५ एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) त्यांच्या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.

  • ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र, पोलिस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा, अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा लागणार.

  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळाधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई- फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत. २१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठ्यांनी ई- फेरफार प्रणालीत वारस फेरफार तयार कराचा आहे.

  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळाअधिकारी संबंधितांच्या वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर दुरुस्त करणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

तहसीलदारांपासून विभागीय आयुक्तांपर्यंत जबाबदारी

महसूल विभागाच्या या आदेशानुसार तालुक्याचे संबंधित तहसीलदार समन्वय अधिकारी असतील. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कालबद्ध कार्यक्रम मुदतीत पूर्ण करण्याची कार्यवाही करायची आहे. जिल्हाधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन मोहीम राबविण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्यांचे निराकरण जिल्हाधिकारी करणार आहेत. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. साप्ताहिक अहवाल प्रत्येक सोमवारी ई-मेलवर सादर करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT