महाराष्ट्र बातम्या

वडेट्टीवार यांना बाळासाहेब थोरातांनी दिला सबुरीचा सल्ला

नामदेव कुंभार

ओबीसी असल्यामुळे महसूल खाते मिळाले नाही, अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात बोलून दाखवली. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचं चित्र आहे. यावरुनच काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी, असा सबुरीचा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

वडेट्टीवार काय म्हणाले होते?

ओबीसी म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे. मात्र, या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही. कारण, तसे झाल्यास या ओबीसी नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असेही दुखणे आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची खंत तर जगजाहीर आहे. ‘ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते. कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं?

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर यापुढील काळात अन्याय होणार नाही यांची आम्ही काळजी घेऊ. काँग्रेस पक्षात कोणतीही धुसफूस नाहीये. वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.

आघाडीतील खदखद बाहेर

विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले, महसूल खाते मिळेल असे वाटले होते. पण कदाचित ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. त्याचबरोबर, ‘वाघ हा आमच्याच इशाऱ्यावर चालतो,’ असे वक्तव्य केल्याने त्यांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता का? अशी चर्चा होत आहे. यानिमित्ताने आघाडी सरकारमधील खदखद बाहेर पडली का, अशीही चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT