State Government Sakal
महाराष्ट्र बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अक्षता पवार

राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे - राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व सभासद शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आर्थिक बाबींचा विचार केल्यास यातील बऱ्याच बाजार समित्यांना या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे निवडणुका पूर्वीच्‍या नियमांप्रमाणे घ्याव्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार नाहाटा यांनी पत्रकार परिषदेत केले.

या प्रसंगी किशोर कुलकर्णी देखील उपस्थित होते. सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कमी होणारे उत्पादन, कमी बाजारभाव त्यातच पूर्वीच्या शासनाने व्यापाऱ्यांना थेट लायसन्स दिल्याने शेतीमालाची आवक कमी प्रमाणात होणे, फळे व भाजीपाला नियमन मुक्ती, स्वस्तधान्य बाजार फी बंद करणे, अशा विविध बाबींचा बाजार समित्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता मराठवाडा, विदर्भातील काही बाजार समित्यांत कर्मचाऱ्यांचे पगार देखील सहा-सहा महिने होत नाही. त्यामुळे नवीन नियमाने निवडणुका घेतल्यास बाजार समित्यांकडे निधीच उपलब्ध राहणार नाही, असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितेल.

नाहाटा म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण ३०६ बाजार समित्यांमधील १७३ बाजार समित्या सोडल्या तर उर्वरित १३३ बाजार समित्यांना या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे निवडणुकीचा खर्च बाजार समित्यांच्या आवाक्याबाहेर जाईल. शेतकऱ्यांनी वर्षातून किमान तीन वेळा तरी शेतीमाल बाजार समितीत विक्री केला पाहिजे, अशी अट घालण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत निवडणूका पूर्वीच्या नियमांप्रमाणे घेण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी नाहाटा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेड ते पूर्णा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT