Chandni Chowk  esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandani Chowk: तब्बल ११ तासांनी चांदणी चौकातून वाहतूक सुरू

मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असलेल्या चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असलेल्या चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली. 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक पुढे मार्गस्थ झाली. (road clean Traffic started from Chandni Chowk Bridge pune)

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एन डी ए रस्ता - बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पुल पाडण्यात आला. दरम्यान रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात करण्यात आली.

मात्र राडारोडा कठीण असल्याने रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तो काढणे अद्याप शक्य झाले नव्हते. त्यामुळे प्रशासनाने रविवारी सकाळी 8 वाजता महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे दिलेले आश्वासन अ पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे अवजड वाहतूकीसह हलक्या वाहना हि मोठा वळसा घालून जावा लागत होता.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे कामाच्या ठिकाणी संपूर्ण रात्र थांबले, कामाच्या ठिकाणी ते आढावा घेत होते. सकाळी 8 वाजता काम पूर्ण होत नसल्याने त्यांनी काही वेळात राडारोडा काढून झाल्यानंतर रस्ता खुला होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, कामाला आणखी गती देण्यात आली. काम अतिशय वेगाने पूर्ण करून 10 वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकातील मुंबईहून सातारा, पुण्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

त्यानंतर वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी साताऱ्याहून येणारी वाहनेही एकच लेन मधून मुंबई चा दिशेने सोडण्यात आली. शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 पर्यंत बंद असलेला महामार्ग 10.8 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT