Rohit Patil won in kavathe mahankal 
महाराष्ट्र बातम्या

सांगली: रोहित पाटलांची राजकारणात दणक्यात एंट्री, निवडणुकीत बाजी

ओमकार वाबळे

राज्यातील 93 नगरपंचायतींचा निकाल आज समोर येत आहे. 336 जागांसाठी पार पडलेल्या मतदानानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष्य लागलं होतं. अखेर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील निकाल हाती आले आहेत. सांगलीतील निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय. विश्वजीत कदम आणि रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. (Sangli Nagarpanchayat Election Updates)

सांगलीतील कवठे महंकाळमध्ये आर.आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहीत पाटील यांनी या नगरपंचायत निवडणुकीत सरशी केली आहे. राष्ट्रवादीने या नगरपंचायतीत एकूण १० जागांवर विजय मिळवला आहे. तर शेतकरी विकास गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या प्रचारात सहभागी झाल्या नव्हत्या. आता निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युवा नेत्याचं कौतुक स्थानिक करत आहेत. (Rohit Pawar wins in kavathe mahankal)

'माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही'

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहित पाटील यांच्यावर प्रचाराची भिस्त होती. वडिलांवरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पाटील यांनी माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणी केली होती. अखेर रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT