Rohit Pawar Allegation On Ajit Pawar Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar On Ajit Pawar : आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी...; रोहित पवारांचा अजितदादांवर थेट आरोप

Rohit Pawar Allegation On Ajit Pawar: राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांचे काका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

रोहित कणसे

Rohit Pawar Allegation On Ajit Pawar Maharashtra Politics Latest News : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून केल्या जात असलेल्या तयारीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील पाहायला मिळत आहेत. यादरम्यान राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांचे काका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस पूर्वीपासूनच गुंडांना भेटतात, एकनाथ शिंदे भेटत असावेत. आता अजित पवार देखील मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं. ही तुमची वृत्ती आहे? असा खोचक सवाल करत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केले आहेत.

रोहिती पवार म्हणाले की, "मला याचं वाईट वाटतं की देवंद्र फडणवीस पूर्वीपासून गुंडांना भेटतात. एकनाथ शिंदे देखील भेटत असावेत. पण आमच्या काकांनीसुद्धा माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं, फक्त मला अडचणीत आणण्यासाठी... ही तुमची प्रवृत्ती... भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा प्रश्न आहे की तुम्ही गुंडाचा वापर करणार?"

"पुण्यात मोठ्या प्रमाणात गुंडांचा वापर करत आहात. माझ्या मतदारसंघात ज्या व्यक्तीला मोक्का लागलाय अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला आहे. हा महाराष्ट्र आहे, इथली लोकं या गुंडापेक्षा खूप मोठी आहेत" असेही रोहित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT