महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : निधीतून १४ हजार कोटींचा गैरव्यवहार;रोहित पवार यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप

महायुतीचे सरकार कमिशन खाण्यात व्यग्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांसाठी निधी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) या नव्याने स्थापन केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून ३५-४० हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून ६ हजार कोटी रुपयांचे कमिशन खाल्ले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महायुतीचे सरकार कमिशन खाण्यात व्यग्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांसाठी निधी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) या नव्याने स्थापन केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून ३५-४० हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून ६ हजार कोटी रुपयांचे कमिशन खाल्ले. यात एकूण १२ ते १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यात घाईघाईने ४० हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांची निविदा काढण्यात आली होती. निविदा काढताना अंदाजपत्रकात १० टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे चार हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.

महामंडळाकडून १४६ निविदा काढण्यात आल्या. त्या २०-२५ टक्के वाढीव दराने भरल्या गेल्या. म्हणजेच मुळात १० टक्के वाढीव दराने काढलेल्या निविदा या नंतर २०-२५ टक्के वाढीव दराने भरण्यात आल्या. या कामाची किंमत जवळपास ३५ टक्के एवढी वाढविण्यात आली. त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयांच्या ३५ टक्के म्हणजेच जवळपास १२ ते १४ हजार कोटी रुपयांचा उघड गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

निविदा प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाला असून निधी नसताना केवळ भ्रष्टाचार घडवण्यासाठी हा गैरव्यवहार केला गेला आहे. यात संबंधित खात्याचे मंत्री, एमएसआयडीसी व्यवस्थापकीय संचालक आणि एका उच्चपदस्थ अभियंत्याचा हात आहे.

- रोहित पवार, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Mumbai News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम, महालक्ष्मी रेसकोर्सवरील प्रकार; प्रशासनाचे तत्काळ कारवाईचे आदेश

गोविंदाची तब्येत बिघडली? चेहऱ्यावर मास्क, पडलेला चेहरा अन्.... सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Gen Z आणि Gen Alpha तरुणांशी संवाद साधला

Khed Shivapur Road Block: खेड-शिवापूर येथील रस्ता रोकोचा फटका; नायगावमध्ये वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा

SCROLL FOR NEXT