Rohit Pawar said Anil Deshmukh is innocent
Rohit Pawar said Anil Deshmukh is innocent Rohit Pawar said Anil Deshmukh is innocent
महाराष्ट्र

रोहित पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील

सकाळ डिजिटल टीम

काटोल (जि. नागपूर) : राज्यात ईडी व सीबीआयचा गैरवापर होत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर १२२ वेळा धाडी टाकण्यात आल्या. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण झाले. तुमचे आमदार निर्दोष आहे. देशमुख कुटुंबासोबत पवार कुटुंब आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) लवकरच बाहेर येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. (Rohit Pawar said Anil Deshmukh is innocent)

काटोल दौऱ्यावर असताना ते बोलत होते. केंद्र सरकारने अतिरिक्त कर वाढवला आहे. यामुळे पेट्रोल (petrol) व गॅसचे दर वाढल्याने महागाई वाढली आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडे (Central Government) २८ हजार कोटी थकबाकी आहे. अनेक अडथळे करून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा केंद्राचा डाव आहे. मात्र, यात केंद्र सरकार कधीही यशस्वी होणार नाही, असेही आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

धर्म व पूजा हा वैयक्तिक विषय आहे. याचा वापर राजकारणासाठी होऊ नये. अलीकडे भाषणातून तरुणाईचे डोकं भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी हे कधीही खपवून घेणार नाही. काटोल विधानसभेच्या विकासकामांसाठी सन २०१९ ते २०२२ कालावधीत ६७४ कोटींचा निधी मंजूर झालेले आहे. त्यातून अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहे, असेही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT