Rohit-Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना (coronavirus) नियमांचे पालन करण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. असे असताना मागील काही दिवसांपासून राजकीय नेतेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते (National congress party) व आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह (Rohit Pawar Corona Positive) आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना वाढला असताना नेते मंडळीही पॉझिटिव्ह येण्याची संख्याही वाढली आहे. राज्यातील नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात कोरोना पॉझिटिव्ह आलेले रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांनी ‘तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे हुलकावणी देत होतो. परंतु, अखेर त्याने मला गाठलेच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपला आशीर्वाद सोबत असल्याने काळजीचे काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले ट्विटद्वारे केले आहे.

राज्यातील कोरोना पुन्हा वाढत आहे. याला राज्यातील नेतेमंडळी देखील हातभार लावत आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण, बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता नेतेही कोरोना (coronavirus) पॉझिटिव्ह येत आहेत. यात रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT