महाराष्ट्र बातम्या

'उशिरा का होईना दिवाळी निमित्तानं मोदी सरकारला जाग आली हे महत्वाचं'

केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे.

इंधन दरवाढीमुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने काही प्रमाणात बुधवारी दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेकांचे बजेट कोलमडले होते. मात्र केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केल्याने काही प्रमाणात सामान्यवर्गाला दिलासा मिळाला आहे. केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून झपाट्याने इंधन दरवाढ सुरु आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह मोठ्या शहरातील सर्वच ठिकाणी पेट्रोलदराने ११० रुपयांचा टप्पा पार केला होता. यातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. दरम्यान, यावरून मोदी सरकारवर टीका सुरु होती. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, तर विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले असून गॅस सबसिडीबाबतही विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

यात ते म्हणतात, केंद्र सरकारने पेट्रोलवरील ५ तर डिझेलवरील १० रुपये दर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील १ आणि डिझेलवरील २ रुपये दर कमी होईल. कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचं आहे, याबाबत आभार! आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर महागाईने 'गॅस'वर असलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा. तसंच #GST सह राज्याचा हक्काचा थकीत निधीही वेळच्यावेळी द्यावा, ही विनंती! कोरोनाच्या काळात लोकं अडचणीत असताना आणि बेरोजगारी वाढली असतानाच पेट्रोल-डिझेलवर आजवरच्या इतिहासात सर्वाधिक कर केंद्र सरकारने या दोन-तीन वर्षांच्या काळात आकारला. त्यामुळं तो तातडीने कमी करण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT