Rohit Pawar may be get an important responsibility  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांना मिळणार पक्षात महत्वाची जबाबदारी? विधानसभेच्या तोंडावर महत्वाचं पद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

Rohit Pawar: कर्जतचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांना पक्षात महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांना पक्षात महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांना महत्वाचं पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्ष संघटनेसोबतच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवार-जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. नगरमधील या घटनेनंतर आता रोहित पवार यांच्यासह रोहित पाटील यांनाही नवी जबाबदारी मिळणार असल्याची पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवारांनी यापूर्वी साहेब संवाद यात्रा, संघर्ष यात्रा काढल्यानंतर लोकसभा निवडणुकीत देखील महत्वाची भूमिका बजावली होती. तर गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार-जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसला. राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद जाहीरपणे पाहायला मिळाला. आता रोहित पवार आणि जयंत पाटील, असा वाद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

रोहित पवार-जयंत पाटील यांच्यात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत दिलेला सबुरीचा सल्ला राज्यात चर्चेचा ठरला आहे. जयंत पाटील यांनी, ‘माझी मुदत किती महिने राहिली, ते मोजत बसू नका, मी नोव्हेंबरमध्ये स्वतःच ‘नमस्कार’ करणार आहे,’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाला रोहित पवार यांच्या आधीच्या वक्तव्याचा संदर्भ होता. मात्र त्यावरून पक्षांतर्गत मतभेदाची चर्चा रंगली. हे पक्षांतर्गत लोकशाहीचे द्योतक असल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत सारवासारव केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT