Chhagan Bhujbal sharad pawar rohit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar Video : ''ओबीसी आरक्षणाबद्दल आता भुजबळांची भूमिका काय?'' रोहित पवारांचा थेट हल्ला, म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः मंत्री छगन भुजबळ यांनी परवा बीडच्या सभेत जुने मुद्दे उकरुन शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता रोहित पवारांनी भुजबळांच्या बदललेल्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केले असून ओबीसी समाजाची जनगणना आणि राजकीय आरक्षणासंदर्भात सवाल केला आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा ते भाजपच्या विरोधात बोलत होते. मविआ सरकारच्या दोन-अडीच वर्षांमध्ये त्यांनी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. परंतु आता जेव्हा त्यांना लक्षात आलं की पद मिळणार नाही उलट कारवाई केली जाईल, तेव्हा त्यांनी भाजपबरोबर जाणं पसंत केलं.

पवार पुढे म्हणाले की, भुजबळ साहेब आता शरद पवार साहेबांबद्दल बोलत आहेत. जेव्हा सत्ता भोगत होते, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते तेव्हा त्यांना हे का सुचलं नाही? असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे. बीडच्या सभेत मुंडे साहेबांनीच आणलेल्या लोकांनी भुजबळांना थांबवलं.

''भुजबळ स्वतःला सातत्याने ओबीसी नेते म्हणत आहेत. आहेतच ते. परंतु पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ते ओबीसी घटकांचे प्रश्न मांडत होते, भाजपविरोधात बोलत होते. ओबीसी समाजाची जनगणना आणि राजकीय आरक्षणाला भाजपचा विरोध आहे, असं ते म्हणायचे.''

''आता ते भाजपबरोबर गेले आहेत. ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत ते आता काय करत आहेत? फॉलोअप घेत आहेत का? सत्तेसाठी भूमिका बदलल्याने लोक भुजबळांवर विश्वास ठेवणार नाहीत. कारण महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे'' असा घणाघात रोहित पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT