Rohit Pawar reaction on electricity worker strike 
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : "भाजपच्या काही लोकांनी जसं राजकारण केलं तसं..." ; वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता राज्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीव्दारे ३ दिवसांचा राज्यव्यापी संप केला आहे. त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागातील बत्ती गूल झाली आहे. सरकार हा संप मोडित काढण्याच्या तयारीत आहे. संपावर गेल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत (Mesma Act) कारवाई होणार आहे, असे आदेश सरकारने दिली आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. (Rohit Pawar reaction on electricity worker strike)

"वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळं ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांनाही त्रास सहन करावा लागतोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी भाजपच्या काही लोकांनी जसं राजकारण केलं तसं वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही राजकारण न करता समोपचाराने हा प्रश्न मार्गी लावावा," अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने कंत्रांटी कर्मचाऱ्यांद्वारे पर्यायी व्यवस्था केली. मात्र सर्व राज्यात ही व्यवस्था राबवण्यात आली नाही. वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली आहे. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT