Rohit Pawar thanked Gadkari; Know the reason
Rohit Pawar thanked Gadkari; Know the reason Sakal
महाराष्ट्र

रोहीत पवारांनी मानले नितीन गडकरींचे आभार; जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) युवा आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानले आहेत. रोहीत पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जाणाऱ्या चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड' या राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 548 D) जामखेड-सौताडा या टप्प्यासाठी १५७.६२ रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी ट्वीट करून नितीन गडकरी यांचे आभार मानले.

रोहीत पवार म्हणाले की, "माझ्या मतदारसंघातील लोकांच्यावतीने केलेल्या विनंतीला मान देऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेबांनी ‘चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड’ NH 548 D या महामार्गातील जामखेड-सौताडा या टप्प्यासाठी १५७.६२ कोटी रूपये मंजूर केले. याबाबत गडकरी साहेब आपले मनापासून आभार!''

तत्पूर्वी काहीच दिवसांपूर्वी रोहीत पवार यांनी विविध विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. कर्जत जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड या ५४८ D या प्रमुख महामार्गासंदर्भातही या दोघांमध्ये चर्चा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT