rohit
rohit 
महाराष्ट्र

जग कोरोनाशी लढतंय अन् हे भाजपवाले... : रोहित पवार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : कोणत्याही राजकीय वादविविदात न पडणारे आमदार रोहित पवार यांनी आज भाजप विरोधात टीका केली आहे, जग कोरोनाशी लढत असताना भाजपला राजकारण सुचत असल्याची प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोना’च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे,

‘राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचे पडले आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात, तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!’ असा सल्ला रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिला आहे. ‘आज एकीकडे भाजपचेराजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे’ अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यपालांना याबाबतचे अधिकार असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. ‘राज्यपालांना निर्णय घेऊ द्या. सध्या नियुक्तीत हस्तक्षेप करणे अयोग्य आहे. हस्तक्षेपामुळे राज्यपालांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येणार नाही. याचिकेतल्या मागण्या सध्या अपरिपक्व वाटत आहेत’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती रोखण्याची विनंती करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT