Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : 'बारामती अ‍ॅग्रो' प्रकरणी रोहित पवारांचा कारखाना 'ईडी'कडून जप्त

Rohit Pawar News : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar News : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती Agro या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती आहे. जवळपास ५०.२० कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात आलेली आहे.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांची ईडीकडून दोन ते तीनवेळा चौकशी झालेली आहे. आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.

ईडीने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबतच, कन्नड एसएसके या बंद साखर कारखान्याच्या खरेदीच्या संबंधाने १ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती. रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी झाली होती. आता जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.

रोहित पवार यांच्या साखर कारखान्याची ईडीने जप्ती केली आहे. यावर आमदार पवार यांनी मिश्‍कील टिप्पणी केली आहे. आता भाजपमध्ये जायला पाहिजे का, असा प्रश्‍न विचारला. झुकणारे आणि रडणारे गेल्याचा टोला लगावून आता लढणारे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. अशा कारवाईला न घाबरता त्याविरोधात लढणार आणि जिंकणार असल्याचा संदेशही त्यांनी समाज माध्यमातून दिला आहे.

आमदार पवार म्हणाले, ‘भाजपने लक्षात ठेवावे. झुकणारे आणि रडणारे गेले. आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरून आचारसंहिता दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतेय.’

रोहित पवार पुढे म्हणाले की, कंपनीवर केलेली कारवाई पूर्णतः बेकायदा आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. प्रश्‍न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना असा प्रश्‍न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशीच कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. मी महादेवाचा भक्त आहे... अन्यायाविरोधात जनता जनार्दनरूपी महादेव तिसरा डोळा उघडेल, तेव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT